कार्यकर्त्यांच्या एकमताने एकोडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, भाजप व कॉंग्रेस पक्षांच्या उमेदवारांसाठी शोध सुरुच…

नव्या नेत्तृत्वाची गरज, जुना चेहरा नकोच कार्यकर्ते व मतदारांचा सुरु, सर्वाधिक मतदान आदिवासी समाजाची…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

गोंदिया व भंडारा जिल्ह्यात सध्या गावा – गावात जिल्हा परिषद व पंचायत समिति निवडणूकीचे वारे जोरावर सुरू असुन गावात निवडणूक रणधुमाळीला वेग आलेला आहे. एकोडी जिल्हा परिषद महिलींसाठी आरक्षित असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या एकमताने एकोडी गावाचे माजी सरपंच रविकुमार ( बंटी ) पटले यांची पत्नी अश्विनी पटले यांचे एकच नाव पक्षाकडे पाठविल्याने राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला निश्चित आहे.

मात्र राष्ट्रीय पक्ष भाजप व कॉंग्रेस पक्षांच्या उमेदवारांसाठी शोध सुरुच आहे. एकोडी जिल्हा परिषद क्षेत्र हे कॉंग्रेस चे गड मानले जात असले तरी नामांकन भरण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर असुन कॉंग्रेस पक्षाने आपला उमेदवार घोषित केले नसल्याने कॉंग्रेस पक्षाचा उमेदवारासाठी शोध सुरुच आहे असे कार्यकर्ते व मतदारांमध्ये चर्चा सुरु आहे.

तसेच पक्षाने जुन्या चेहऱ्यांना संधि न देता नविन चेहऱ्यांना संधि द्यावी अशी सुद्धा चर्चा कार्यकर्ते व मतदारांमध्ये सुरु आहे. एकोडी जिल्हा परिषद क्षेत्रात सर्वाधिक मतदान आदिवासी समाजाची असल्यामुळे ते कोणता निर्णय घेतात याकडे सुद्धा सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष लागलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here