Breaking | १० हजारांची लाच घेताना उमेद कार्यालय कंत्राटी अधिक्षक लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात…

गोंदिया – अमरदिप बडगे

गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय ईमारतीमध्ये असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोती अभियान,जिल्हा अभियान व्यवस्थापन (उमेद) कक्षातील
कार्यालयीन कंत्राटी अधिक्षक अमोल अन्नाजी भागवत यास 10 हजाराची लाचेची मागणी करुन ती स्विकारतांना आज लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

ग्रामीण भागातील महिलांच्या स्वयंसहाय्यता गटाव्दारे तयार केलेल्या वस्तुच्या विक्रीसाठी गोंदिया शहरात (पलाश)केंद्र उभारण्याकरीता उमेद कार्यालय व तक्रारकत्याा वडीलासोबत करार झालेला होता.त्यानुसार नोव्हेंबर 2020 ते फेबुवारी 2021 पर्यंतचे भाडे प्राप्त झालेले होते.त्यानंतर कोवीड 19 मुळे करार रद्द करण्यात आले होते.

त्यानंतर तक्रारदार हे उमेद कार्यालयातील अधिक्षक अमोल भागवत यांना मार्च ते जून 21 पर्यंतचे भाडे काढून देण्यासंदर्भात भेटले असता तक्रारदाराकडे 10 हजार रुपये लाचेची मागणी केली.तक्रारदारास मात्र रक्कम द्यायची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 2 आँगस्ट रोजी तक्रार नोंदवली.

त्या तक्रारीच्या आधारे 3 आँगस्टरोजी पडताळणी करुन आज 4 ऑगस्ट रोजी सापळा रचून रंगेहाथ लाच स्विकारतांना पकडण्यात आले.ही कारवाई पोलीस उपअधिक्षक रमाकांत कोकाटे यांच्या नेतृत्वात त्यांच्या पथकातील चमूने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here