उजळाईवाडी सरपंच पद वाचले एका मताने अविश्वास ठराव नामंजूर…

कोल्हापूर – राजेद्र ढाले

उजळाईवाडी(ता.करवीर) येथील सरपंच सौ.सुवर्णा दिलीप माने यांच्या विरुद्धचा ठराव नाट्यमय घडामोडी नंतर एका मताने अविश्वास ठराव नामंजूर करण्यात आला.अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी 18 पैकी 14 सदस्याची ठरावाच्या बाजूने मतदान होणे आवश्यक असते परंतु 13 सदस्यच या विशेष सभेला उपस्थित होते.त्यामुळे अविश्वास ठराव एका मताने नामंजूर करण्यात आला.

यावेळी अविश्वास ठराव सादर करण्यासाठी निवेदन देणाऱ्या 14 सदस्यापैकी तानाजी शामराव चव्हाण हे सदस्य ही गैरहजर राहिल्याने उजळाईवाडी सरपंच विरोधात एकत्रित आलेल्या ग्रामपंचायत सदस्यमध्ये फुट पडल्याचे दिसून आले.उजळाईवाडी ग्रामपंचायत मध्ये सदस्य संख्या लोकनियुक्त सरपंच सुवर्णा माने यांच्यासह 18 इतकी असून सदस्यसंख्या 75 टक्के म्हणजेच किमान 14 सदस्याची अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करणे आवश्यक होते.

परंतु यापैकी तानाजी चव्हाण, प्रकाश मेटकरी,अजय पाटील,राजु गवाणकर व सरपंच सुवर्णा माने हे विशेष सभेला गैरहजर राहिल्याने अविश्वास ठराव साठी आवश्यक असणारे संख्याबळ जुळवता न आल्याने सदर ठराव नामंजूर करण्यात आला.सरपंच सुवर्णा माने ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कारभार करत असल्याचा ठपका ठेवत विरोधी सदस्यां बरोबर सत्ताधारी सदस्यांनीही बंडाचा झेंडा फडकला होता.परंतु यापैकी तानाजी चव्हाण,

प्रकाश मेटकरी, अजय पाटील, राजु गवाणकर व सरपंच सुवर्णा माने हे विशेष सभेला गैरहजर राहिल्याने अविश्वास ठराव साठी आवश्यक असणारे संख्याबळ जुळवता न आल्याने सदर ठराव नामंजूर करण्यात आला.सरपंच सुवर्णा माने ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कारभार करत असल्याचा ठपका ठेवत विरोधी सदस्यांन बरोबरच सत्ताधारी सदस्यांनीही बंडाचा झेंडा फडकला होता.परंतु सौ.सुवर्णा माने यांनी मुत्सद्दीपणाने राजकीय खेळी करत सदर अविश्वास ठराव फेटाळला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करविरच्या तहसीलदार शितल मुळे भामरे यांनी काम पाहिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here