उद्यापासून एस.टी.कर्मचारी बेमुदत संपावर – भाजपा कामगार आघाडी चे निवेदन…

सांगली – ज्योती मोरे.

सांगली आगारातील असंख्य कर्मचारी एस टी महामंडळ शासना मध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी उद्या दिनांक 3-11-2021 पासून बेमुदत संपावर उतरणार आहेत.
याबाबतीतले निवेदन सांगली एसटी आगारातील कर्मचाऱ्यांच्या वतीने सांगली एसटी विभाग नियंत्रक भोकरे साहेबांना देण्यात आले. यावेळी बोलताना माजी आमदार, नितीन शिंदे म्हणाले, की एसटी महामंडळाचे महाराष्ट्र शासनामध्ये विलीनीकरण करणे, ही एसटी कामगाराच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची मागणी आहे.

दि.28 ऑक्टोंबर च्या उपोषणातून,एसटी महामंडळातील मान्यताप्राप्त संघटनेने व संयुक्त कृती समितीने काय मिळवले. महागाई व इतर भत्ते तर कामगारांना मिळणारच होते.आंध्र प्रदेश सह इतर राज्याच्या धरती वर महाराष्ट्र एसटी महामंडळाचे शासना मध्ये विलीनीकरण झाले पाहिजे.होता. भारतीय जनता पार्टी या विलीनीकरणाच्या मागणी बाबत कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.

यावेळी बोलताना भाजपा कामगार आघाडीचे उपाध्यक्ष श्री अविनाश मोहिते म्हणाले या महा विकास आघाडी सरकार मध्ये तिन्ही पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांच्याचं सर्व संघटना आहेत. भारतीय जनता पार्टीने एसटीच्या विलीनीकरणाला ठाम पाठिंबा दिला आहे.

मग शासनाला निर्णय घ्यायला काय अडचण आहे. भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मा. सुब्राव तात्या मद्रासी, भाजपा ओबीसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष मा. अमरभाऊ पडळकर, भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रियानंद कांबळे, दीपक कर्वे, उदय बेलवलकर, भाजपा पदाधिकारी यांच्यासह,

सांगली आगारातील कर्मचारी विनायक पवार, राजू खैरमोडे,सुरेश माने, सुहास माळी,महेश शेळके, शामराव पाटील, शामराव कोरे, घनश्याम पाटील,बाबासाहेब भंडारे,श्रीकांत हाक्के,बाजीराव जाधव,विजय पाटील, नितीन गोरे धनाजी माने, दिलीप पवार,प्रमोद अर्जुने , रणजित भोसले रमेश धुमाळ, सचिन सोनवणे,श्याम सुंदर बेले,विजय मोरे, स्वप्नील पाटील यांच्यासह असंख्य एसटी कर्मचारीउपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here