ब्रह्मपुरी तालुक्यात वाळू तस्करीला उधान महसूल विभाग बेभान?…

रितेश देशमुख,चंद्रपूर

चंद्रपूर :- ब्रह्मपूरी तालुक्याला वैनगंगा नदी लागून आहे. या नदीकिनारी बेलगांव,तपाळ, बालेश्वर,अ-हेर नवरगांव,पिपंळगांव,सोनेगांव,बोढेगांव,रणमोचन,चिचगांव,आवळगांव, हळदा,बोडधा,हि गांवे बसलेली आहेत. या नदि पात्रात मोठ्या प्रमाणात दरवर्षी वाळूचा साठा असतो. मागील दोन वर्षापासून या नदी घाटाचे लिलाव झाले नाही. मात्र येथील वजनदार नेत्यांनी तहसीलदार एस.डि.ओ. तलाठी यांना आपल्या मुठीत ठेवून आपल्या चेले पटाटयाचे व आपले खिसे भरण्याकरिता नदी घाटाचे रान मोकळे करून दिले.

यामुळे तहसीलदार एस.डि.ओ..न कहु तो बाप कुत्ताँ खाँये ,कहु तो माँ मर जाये। या प्रमाणे आपले कर्तव्य विसरून या नदी घाटातील करोडो रुपयाच्या वाळू कडे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे शासनाचे करोडो रुपयाचे महसूल बुडत आहेत. या कार्यात सक्रिय असलेले वाळू माफिया वरील वाळू घाटावरून रात्रीच्या दरम्यान हजारो ब्रास वाळू उपसा करून दररोज करोडो रुपयांचा व्यवसाय सुखरूप पणे करीत आहेत. या रात्रीच्या दरम्यान वाळू माफिया चा तस्करीत बेधडक पणे वाहनाची धावपळ होत असल्याने ट्रॅक्टरच्या धडकेने वाहतुकी दरम्यान ब्रह्मपुरी तालुक्यात निष्पाप लोकांचे बळी जात आहेत.

याबरोबरच जड वाहतुकीने रस्त्याची ऐसी तैसी झाली आहे. हे या वजनदार नेत्यांना त्यांच्या चेले चपाटयांना तहसीलदार,एस.डि.ओ. तलाठी यांना माहीतच आहे पण शासनाच्या पगारावर नोकरी करणाऱ्या तहसीलदार,एस.डि.ओ. यांना कर्तव्याचे भान असते तर वाळू तस्करीला उधान आलेच नसते. मात्र भाऊ सबसे बडा रुपयाँ चि लालच लागली आहे. नां…? अशी चर्चा देखील ब्रह्मपुरी तालुक्यात नागरिकांमध्ये होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here