IPL2020 साठी UAE सज्ज…दुबई आणि अबूधाबी स्टेडियमचे प्रकाशाने सौंदर्य खुलले…

न्यूज डेस्क – इंडियन प्रीमियर लीग IPL2020 च्या १३ व्या हंगामासाठी अजून काही दिवस शिल्लक असताना दुबई आणि अबूधाबी स्टेडियमचे प्रकाशाने सौंदर्य तुम्हाला आकर्षित करीत असल्याचे फोटोत दिसत आहे.

बहुप्रतिक्षित T-20 स्पर्धा अबू धाबी येथे 19 सप्टेंबरपासून सुरू होईल. उद्घाटन सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना असेल.

स्पर्धेतील सर्वच संघाची तयारी जोरदार सुरु असून सामने खेळण्यासाठी स्टेडियम सज्ज झाले असल्याचे भारतीय क्रिकेट बोर्डाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी बुधवारी आपल्या ट्विटर हँडलवर दुबई आणि अबू धाबीच्या स्टेडियमचे फोटो शेअर केले आहेत. प्रकाशात न्हाऊन निघालेल्या या स्टेडियमचे फोटो डोळ्यांचे पारणे फेडत आहे.

दुबई आणि अबू धाबीमधील स्टेडियमचे किती नेत्रदीपक आणि चित्तथरारक दृश्य. युएई आयपीएल २०२० च्या बहुप्रतिक्षित स्पर्धेचे आयोजन करण्यास सज्ज आहे. जग सज्ज आहे, आणि म्हणूनच आम्ही! असे tweet BCCI चे सचिव जय शाह यांनी केले आहे.

महत्त्वाचे म्हणजे आयपीएलच्या एकूण ५६ लीग सामन्यांमध्ये दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर २४ सामने खेळले जातील, तर अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर २० सामने खेळले जातील.

दुसरीकडे, 12 लीग सामने शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळले जातील. नुकतीच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी शारजाह स्टेडियमवर भेट दिली. विशेष म्हणजे, कोविड -१९ मधील वाढती घटना लक्षात घेता आयपीएल २०२० युएईमध्ये होत असून या टी -२० लीगचे आयोजन दुबई, अबू धाबी आणि शारजाह करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here