रानडुक्कराच्या धडकीने दुचाकीला अपघात; दोन युवक गंभीर जखमी…

पातूर – निशांत गवई

बाळापूर रोडवर देऊळगाव नजीक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ दुचाकी गाडी क्रमांक mh 30 AX 9921रानडुक्कराची धडक लागल्याने अपघात होऊन दोन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

पातूर वरून बाळापूर कडे जात असतांना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एम.आय.डी. सी. देऊळगाव नजीक रात्री 8 वाजताच्या सुमारास अचानक रानडुक्कर आडवे आल्याने दुचाकीला धडक लागून दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत,जखमीमध्ये दत्ता ठाकरे रा.देगाव मानकी(24) व ऋषिकेश तराळे,रा.देगाव मानकी(19) हे दोघे गंभीर जखमी झाले असून दोन्ही जखमींना पुढील उपचाराकरिता अकोला येथे हलविण्यात आले.

यावेळी पातूर येथील पत्रकार स्वप्निल सुरवाडे, प्रमोद कढोणे,निशांत गवई, पातूर पोलीस स्टेशनचे हे.कॉ. दिलीप तिवारी,पो.कॉ.मयूर उमाळे, पो.चालक कैलास केकन तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा सर्पमित्र संजय बंड व अमोल सोनोने,सनी सुरवाडे यांनी जखमींना अपघात स्थळावरून आरोग्य केंद्र पातूर येथे प्राथमिक उपचारासाठी आणून पुढील उपचारासाठी अकोला येथे रवाना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here