Breaking । पातूर धरणात पोहायला गेलेल्या २ युवकांचा बुडून मृत्यू…

पातूर – निशांत गवई

पातूर शहरातील धामणधरी चा तलाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या तलावात आज दोन युवकां चा डुबून करून मृत्यू झाल्या चि घटना आज दुपारी अंदाजे 2 वाजता चे दरम्यान घडली याबाबत सविस्तर माहिती अशी कि शहरातील साळणी पुरा येथील चार युवक हे पोहण्या करिता धामणधरी च्या तलाव मध्ये आज दुपारी अंदाजे 12 वाजता च्या दरम्यान गेले असता,

पोहण्या साठी गेलेल्या चार युवकांपैकी शेख दानिश शेख अस्लम वय अंदाजे 16 वर्ष रा. साळणी पुरा पातूर तर शेख समीर शेख रईस रा. साखरखेर्डा हे दोघे हि पोहण्या साठी गेले असतांना बाहेर न आल्यामुळे त्यांच्या दोन मित्रा चि तारांबळ उडाली असता एक मित्र त्या ठिकाणी थांबून दुसऱ्या मित्रा ने सदर चि घटना सांगायला घरी गेला असता सदर घटनेचि माहिती शहरात वाऱ्या सारखी पसरताच नागरिकांनि धामणधरी तलावाच्या कडे धाव घेतली.

मात्र येवडा वेळ होऊन सुद्धा मृतक चे शव बाहेर न आल्यामुळे पातूर येथील देविदास नारायण श्रीनाथ यांनी तलावात डुबकी मारून मृतक दानिश व समीर या दोन्हीही युवकांचे मृतदेह बाहेर काढले घटनेचि माहिती होतच नायब तहसीलदार अहेफाजोद्दीन सैय्यद माजी नागराध्यक्ष हिदायत खा रूम खा माजी नगर सेवक शे. अय्याज आणि पातूर पोलीस कर्मचारी घटनास्थळ वर हजर होऊन मृतका चे पार्थिव देह अकोला कडे रवाना करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here