वळीव पावसाने घेतला दोन वर्षीय चिमुकल्याचा जिव…

कोगनोळी – राहुल मेस्त्री

कोगनोळी ता.निपाणी येथे काल दि.11/10/2020 रोजी सायंकाळी पडणाऱ्या वळीव पाऊसाच्या दरम्यान मनाला सुन्न करणारी घडली आहे. येथील महेश कोकणे यांचा दोन वर्षीय चिमुकला सक्षम महेश कोकणे. 6:30 च्या दरम्यान शेजारील सुतार यांच्या घरी गेला असता.वळवाच्या पावसाने तुडुंब भरून वाहणाऱ्या गटारीमध्ये पडल्याची घटना घडली.

पावसाचा जोर ओसरल्याने खेळत असणारा चिमुकला क्षणात गायब झाल्याने कुटुंबातुन आक्रोश करण्यात आला होता. चिमुकला संक्षम गटारीत पडला की काय अशी भिती व्यक्त केली जात होती.यामुळे कोगनोळी गावातील सर्व धार्मिय शेकडो तरुण मुलाचा शोध घेत होते. जरी पाऊस ओसरला असला तरी पाण्याचा प्रवाह अतिवेगाने असल्याने शोधमोहीम करण्यास अडचणी निर्माण होते होत्या.

पाण्याच्या प्रवाहातील आस पासच्या गटावरील प्लेटा काढून मुलाचा शोध घेतला जात होता.यावेळी कोगनोळी आऊट पोस्टचे पोलीस अधिकारी घटना स्थळी दाखल झाले होते.
तब्बल पाच तासानंतर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सदर चिमुकल्याचा मृतदेह घटना स्थळापासुन अर्धा किलोमीटर वरील हंचिनाळ रोडजवळील स्मशानभूमी शेजारी असणाऱ्या ओढ्याजवळ सापडला. ही घटना येथील परिसरात वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली.

मृतदेह हाती लागताच त्यांच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांना अश्रू अनावरण होऊन हंबरडा फोडला. त्यांचा तो आक्रोश पाहून अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाही.त्यानंतर रात्री उशिरा निपाणी येथील शासकीय गांधी इस्पितळात शवविच्छेदन करून चिमुकला सक्षमचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.आणि हंचिनाळ रोडवरील स्मशानभूमी शेजारीच या दोन वर्षाच्या सक्षमचा अंत्यविधी करण्यात आला.

घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बी. एस. तळवार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घटना घडलेल्या ठिकाणापासून ते मृतदेह सापडलेल्या ठिकाणापर्यंत पाहणी करून पंचनामा केला. यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील,

माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्यासह लोखंडे गल्लीतील सर्व नागरिक उपस्थित होते. दोन वर्षाच्या चिमुकल्याचा वळवाच्या पावसाने बळी घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मृत सक्षमचा येणाऱ्या शुक्रवारी 16/10/2020 रोजी दुसरा वाढदिवस होता..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here