मनोर – मुंबई अहमदाबाद महामार्गावर गुजरात मार्गिकेवर ढेकाळे गावच्या हद्दीतील वाघोबा खिंडीत शुक्रवारी (ता.25)रस्ता दुभाजकाला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला.
तपन भिसे असे मयत दुचाकीस्वाराचे नाव असून तो सफाळे गावचा रहिवासी होता.जित पाटील (वय.20)हा गंभीर जखमी झाला असून,त्याच्यावर मनोर मधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.