अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार…

बुलढाणा – अभिमान शिरसाट

चिखली येथून जवळच असलेल्या दहीगाव ते करणखेड फाट्याच्या मध्ये दिनांक 26 एप्रिल च्या रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा घटनास्थळावर मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीवरून सविस्तर असे की, चिखली तालुक्यातील बोरगाव काकडे येथील अरुण निवृत्ती काकडे वय अंदाजे 35 वर्ष या युवकाचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागेवरच मृत्यू झाला.अपघात इतका भीषण होता की, मोटार सायकलचा चेंदामेंदा झाला असून अरुण निवृत्ती काकडे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

अमडापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व अरुण काकडे यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. यावेळी अमडापुर पोलीस स्टेशनचे कर्मचारी ए.एस.आय. वाघ ,चालक बोरकर उपस्थित होते. या अपघात प्रकरणी मर्ग दाखल केला असून पुढील तपास अमडापुर पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here