भारतविरोधी प्रचार करणाऱ्या ३५ यूट्यूब चॅनल्स सोबत दोन वेबसाइट्स वर बंदी…

न्युज डेस्क – भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पुन्हा एकदा 35 यूट्यूब चॅनेल, 2 ट्विटर अकाऊंट, 2 इंस्टाग्राम अकाउंट, 2 वेबसाइट आणि एका फेसबुक अकाउंटला ब्लॉक करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. मंत्रालयाचे सहसचिव विक्रम सहाय यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या चॅनेलचे 12 दशलक्ष सदस्य होते आणि त्यांचे व्ह्यूज दशलक्ष होते. या सर्व माध्यमांतून भारतविरोधी प्रचार केला जात होता. विक्रम सहाय यांनी सांगितले की, हे सर्व चॅनेल आणि खाती पाकिस्तानमधून चालवली जातात आणि भारतविरोधी बातम्या आणि इतर मजकूर पसरवतात.

सचिव, माहिती आणि प्रसारण मंत्रालय (Secretary, Ministry of Information & Broadcasting) अपूर्व चंद्रा सांगतात की 20 यूट्यूब चॅनेल पाकिस्तानचे होते आणि यावेळी देखील 35 चॅनेल पाकिस्तानचे आहेत. गुप्तचर संस्था त्यांच्या निधीची माहिती घेणार.

याआधी गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही भारतविरोधी प्रचार करणाऱ्या 20 यूट्यूब चॅनेल आणि दोन वेबसाइट्सवर बंदी घालण्यात आली होती. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले होते की, आम्ही भारतविरोधी प्रचार आणि फेक न्यूज पसरवणाऱ्या वेबसाइट्सवर कारवाई केली आहे.

यूट्यूब चॅनल आणि वेबसाइट पाकिस्तानमधून चालवल्या जाणार्‍या प्रोपगंडा नेटवर्कशी संबंधित आहेत आणि ते भारताशी संबंधित विविध संवेदनशील विषयांबद्दल खोट्या बातम्या पसरवत होते. माहितीयुद्धाचा हा नवा मार्ग असून सरकार त्याबाबत कठोर झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here