Breaking | दोन अज्ञात महिलांची मालगाडी समोर उड्या घेवून आत्महत्या !…मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाजवळची घटना…

मूर्तिजापूर येथील रेल्वे स्थानकावर रात्री दोन अज्ञात महिलांनी आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडीस आली. सविस्तर वृत्त 2 ऑक्टोबर च्या रात्री 11:25 मिनीटांनी 2 महिला वय अंदाजे 55 व 30 वर्षीय यांनी येणाऱ्या मालगाडी समोर रेल्वे ट्रॅक वर जाऊन आत्महत्या केल्याचे समजत आहे.

घटनेबाबत मूर्तिजापूर GRP रात्रीचे स्टेशन परिसरातील CCTV तपासून घेत असताना सदर महिला दोन्ही महिला ह्या रेल्वे कॉलनी,धामणगाव फैल च्या मार्गाने आल्या असल्याचे प्राथमिक माहिती असून अद्यापही या दोन्ही महिलांची ओळख पटली नाही.

पुढील तपास ठाणेदार किरण कालवे यांच्या मार्गदर्शन खाली रेल्वे पोलीस चौकीचे इन्चार्ज राजू जळमकर, पोलीस हवालदार शेख कलीम पंचनामा करून तपास करीत आहे.मूर्तिजापूर रेल्वे पोलीस चौथीचे इन्चार्ज राजू जळमकर यांनी वंदे मातरम् आपत्कालीन पथकाच्या टीम ला फोन करून दोन महिलेनेची रेल्वे कटिंग झाली आहे.

ही माहिती टीम ला दिली. तसेच टीम चे संचालक पुंडलिक सगेले अध्यक्ष सेनापती उपाध्यक्ष गौतम दिंडोरे सचिव विक्की गावंडे सरचिटणीस सागर वांदे सदस्य अक्षय सुर्यवशी यांनी घटनास्थळी जाऊन मृतक व्यक्तीला लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात पी एम साठी आणण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here