दोन महसूल मंडळांना मिळणार पिक विम्याचा लाभ…

प्रारंभी 25% अग्रिम विम्याचा मिळणार लाभ.
विरली(बू.)व लाखांदूर महसूल मंडळाचा समावेश
.

लाखांदूर – नास्तिक लांडगे

गत ऑगष्ट महिन्यात वैनगंगा व चुलबंद नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकशेती नष्ट झाली होती.या नुकसानीची दखल घेत शासनाच्या प्रधानमंत्री कृषी पिक विमा योजनेंतर्गत तालुक्यातील दोन महसूल मंडळांना लाभ मिळणार आहे.

या मंडळात विरली(बू.)व लाखांदूर मंडळाचा समावेश असुन सबंधित मंडळातील विमाधारक शेतक-यांना प्रारंभी विम्याचे 25%अग्रिम दिले जाणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.सविस्तर असे की गत ऑगष्ट महिन्यात तालुक्यातील वैनगंगा व चुलबंद नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने नदीकाठावरील व लगतच्या भागातील पिकशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

पुरामुळे संपुर्ण पिकशेती नष्ट झाल्याने बाधित शेतक-यांना नुकसान भरपाई सह विम्याचा लाभ मिळण्याहेतू बाधित क्षेत्राचे पंचनामे व सर्व्हेक्षण देखील करण्यात आले होते.त्यानुसार तालुक्यातील 35गावातील 4हजार 439हे.

क्षेत्राला नुकसान भरपाई देण्यात येणार असुन विरली(बू.)व लाखांदूर मंडळातील सर्व पिकविमाधारक शेतक-यांना पिकविम्याचा लाभ मिळणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.दरम्यान शासनाच्या प्रधानमंत्री कृषी पिक विमा योजनेंतर्गत पुर्णत:नष्ट पिक शेतीला दर हेक्टरी 38 हजार 100रु.चा विमा अनुदान दिला जातो.

त्यानुसार तालुक्यातील बाधित विरली(बू.) व लाखांदूर मंडळातील धान व सोयाबीन उत्पादक व पिक विमा धारक शेतक-यांना प्रारंभी 25% तर उर्वरित विमा आणेवारीच्या आधारावर दिला जाणार असल्याची माहिती आहे.

मात्र या विम्या अंतर्गत भागडी मंडळातील बाधित गावांना लाभ होणार नसल्याने या भागातील शेतक-यांना विम्याचा लाभ मिळण्यासाठी बाधित क्षेत्राचे विमा कंपनी व कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचा-यांकडून प्रत्यक्ष पंचनामे व सर्व्हेक्षण केले जाणार असल्याची देखील विश्वसनीय माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here