अज्ञात वाहनाच्या धडकेत सावदा येथील दोन जागीच ठार…

फोटो - सांकेतिक

रावेर – उमाकांत मराठे

राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद जवळ गोदावरी हॉस्पिटलजवळच्या रेल्वे उड्डाण पुलाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सावदा येथील दोन मोटारसायकलस्वारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ९:१५ वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, राजेंद्र भादू डोळे (वय ४२; पाटीलपुरा सावदा, ता. रावेर) व शेख महेमूद शेख रज्जाक (वय५३ रा सावदा) हे दोन्ही जण मोटारसायकलवरून जळगावकडे कामानिमित्त येत होते. दरम्यान, रेल्वे उड्डाण पुलाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत हे दोन्ही जण जागीच ठार झाले.

अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात नशिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here