डहाणू तालुक्यात पुन्हा वीज पडून दोघाचा मृत्यू…

डहाणू – जितेंद्र पाटील

डहाणू तालुक्यातील कुर्जे गावात कुर्जे धरणाच्या जवळ संध्याकाळी 5 च्या सुमारास वीज पडून दोन जण जागीच मृत्युमुखी पडले.सचिन कुवरा वय 27 व अतुल गोवारी वय 18 हे दोघेही बेंडगाव येथील रहिवासी आहेत.

ते दोघे मोटारसायकल वरून घरी जात असताना रस्त्यात त्यांच्या अंगावर वीज पडून दोघेही जागीच मृत्युमुखी पडले.दोन दिवसा पूर्वी तवा येथील एक जण वीज पडून मृत्यू मुखी पडला होता तर एक गंभीर जखमी झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here