मयूर पेट्रोल पंपाजवळ अपघात दोन ठार…

कोल्हापूर – राजेंद्र ढाले

ऊसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉली खाली अचानक दुचाकी आल्याने दोन परप्रांतीय युवक जागीच ठार झाले ही घटना साधारण ९.३० दरम्याने घडली आहे ऊसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉली सिद्धार्थ पांडुरंग जिरगे (रा.बानगे ता.कागल)हे हे घेऊन जात होते या अपघातामध्ये दिलीप इंद्रजीत चौहान (वय २१)व मोहित टुणटुणसिग चौहान (वय २३) तसे ठार झालेल्याची नावे आहेत दिलीप व मयूर हे दोघेही मामेभाऊ होते दोघेही याच परिसरातील एका फर्निचर मॉल मध्ये कामाला होते.

काम संपल्यानंतर दोघेही मोटरसायकल वरून कोल्हापूरला येत असताना याच वेळी ऊसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉली सह कोल्हापूरकडे येत होता मोटरसायकल पाठीमागून त्या ट्रॅक्टर ट्रॉली ला जोरात धडकली ही धडक इतकी जोराची होती की या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला याची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाणे झाले आहे पुढील तपास पोहेकाॅ.खोत व शेख करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here