वाशीम | पारवा येथे दोन घराला आग…आगीत लाखोंचं साहित्य जळून खाक…

वाशिम – पवन राठी

वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपिर तालुक्यातील पारवा इथल्या बाळू मस्के आणि ज्ञानेश्वर मस्के या दोन भावंडाच्या घराला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.

यांच्यात बाळू मस्के यांच्या अर्चना नामक मुलीचं लग्न १६ मार्चला असल्याने लग्नासाठी आणलेलं सर्व साहित्य व एक मोटार सायकल तसेच घरातील धान्य आगीत जळून खाक झाले आहे. यामध्ये लाखों रुपयाचे नुकसान झाल्याने शेतकरयावर मोठं संकट उभे राहिले आहे.

तुर 18 क्विंटल किंमत एक लक्ष 26 हजार, गहू 20 क्विंटल किंमत 34 हजार, प्लेटिना बजाज कंपनीची मोटर सायकल क्रमांक एम. एच. 37 एफ.6594 किंमत 40 हजार,
लग्नाचे आदंनसाठी आणलेले लोखंडी कपाट किंमत 10 हजार, स्टील रॅक किंमत अंदाजे पंधरासे, कूलर अंदाजे किंमत 4 हजार 500, लग्नाचा बस्ता 15 हजार,

गादी दिवाना 13 हजार, व संसारोपयोगी साहित्य तीन, पत्रे 50 हजार, असे एकूण दोन लक्ष 94 हजार रुपया चे साहित्य या आगीत जळून खाक झाली आहे. दोन दिवसावर असलेल्या मुलीच्या लग्नाची चिंता यांना लागली आहे. आता कसे करावे यांची काळजी या परिवाराला सतावत असुन माझ्या मुलीचे लग्न करण्याकरीता शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी मस्के यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here