मोठी बातमी | दोन हेलिकॉप्टरची हवेत धडक…वैमानिकासह १५ जणांचा मृत्यू

फोटो- Tweeter

न्यूज डेस्क -अफगाणिस्तानच्या दक्षिणी हेलमंदमधील नवा जिल्ह्यात अफगाणिस्तानच्या हवाई दलाचे मिल एमआय -17 दोन हेलिकॉप्टरची धडक झाल्याने वैमानिकांसह १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती भारतीय वृत्तसंस्था ANI दिली आहे.

वृत्तसंस्था ANI दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानच्या दक्षिणी हेलमंदमधील नवा जिल्ह्यात अफगाणिस्तानच्या हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरची धडक झाली. या अपघातामुळे किमान 15 जणांचा मृत्यू झाला.

हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यानं हा अपघात घडला असल्याच प्राथमिक माहिती समजत आहे. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप कळू शकलं नाही. या प्रकरणी जखमींचा देखील आकडा अद्याप समोर आला नाही. सध्या या ठिकाणी प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेकडून बचावकार्य सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

सैन्याचे हेलिकॉप्टर खाली कोसळल्याची माहिती प्रशासनाला मिळताच प्रशासनाचे अधिकारी आणि आपत्कालीन व्यवस्थापनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमध्ये जखमी झालेल्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here