शेतात गेलेल्या दोन वुद्ध शेतकऱ्यांचा विद्युत शॉक लागून मुत्यु…तेल्हारा तालुक्यातील धक्कादायक घटना

दोघेही शेतात अंबाडीची भाजी आणण्यासाठी गेले होते…विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

कुशल भगत,अकोट,तेल्हारा प्रतिनिधी

तेल्हारा तालुक्यातील मनब्दा येथील शेतात विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने दोन वृद्ध शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजताचे सुमारास घडली. पांडुरंग अमृता पाथ्रीकर (७०) व रामकृष्ण संपत शिखरे (७४) अशी मृतकांची नावे आहेत.

मनब्दा येथील पांडुरंग पाथ्रीकर व रामकृष्ण शिखरे हे दोघे मित्र असून ते नेहमी सोबतच राहायचे. शुक्रवारी हे दोघेही गावातील सहदेव खरा
यांच्या शेतात अंबाडीची भाजी आणण्यासाठी गेले होते. तेथे विहिरीजवळच्या विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावक यांनी शेतात धाव घेतली.

दोघांचेही मृतदेह विहिरीजवळ पडलेले आढळून आले. तेल्हारा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा येथे पाठवीण्यात आले आहे या घटनेमुळे सर्वत्र गावात हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here