शिक्षक मतदार संघातील दोन उमेदवारांची भाऊबीज…निवडणुका अश्या ही लढवल्या जाऊ शकतात…!

महाविकास आघाडी व शिक्षक आघाडीचे उमेदवार प्रा.श्रीकांत देशपांडे भाऊबीज निमित्य शिक्षक मतदार संघातील अपक्ष उमेदवार संगिताताई शिंदे यांच्या घरी भाऊबीज निमित्य जाऊन भेट घेतली, तर संगीताताई यांनी आमदार प्रा. देशपांडे यांना ओवाळून विजयी होण्याच्या शुभेच्छा दिल्यात.

येत्या १ डिसेंबर रोजी राज्यात अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुक होणार आहे. यासाठी अमरावती विभागातून तब्बल २८ उमेदवार मैदानात असल्याने यावेळेसची अत्यंत चुरशीची होणार आहे. विद्यमान आमदार प्रा.श्रीकांत देशपांडे यांना यावेळेस मोठ्या प्रतिस्पर्धी सोबत सामना असल्याचे सध्या चित्र आहे.

त्यात मुख्य प्रतिस्पर्धी पैकी माजी मंत्री अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीताताई शिंदे ह्या प्रतिस्पर्धी असल्याने प्रा.देशपांडे यांनी निवडणुकीत आपल्या स्वभावाचा परिचय देत संगिताताई शिंदे यांच्या घरी भाऊबिज निमित्त गेले असता संगिताताई शिंदे यांनी प्रा.श्रीकांत देशपांडे यांना ओवाळले सोबतच विजयी होण्याच्या शुभेच्छाही दिल्यात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here