विकास दामोदर, तेल्हारा
केवळ तेल्हारा तालुकाच नव्हे तर संपूर्ण अकोला जिल्ह्यातील रस्ते जणू मृत्यूचा सापडाच बनलेले आहेत मागील वर्षात छोटे मोठे अपघात जर पकडले तर अपघातची शेकडोच्या वर शृंखाला गेलेली दिसेल.तेल्हारा तालुक्यातील मुख्य राहूदरीचा मार्ग म्हणजे तेल्हारा अडसूळ मार्ग याच मार्गांवत सकाळी दोन मोटार सायकली अमोरासमोर धडकल्या.
खड्डेमय व धुळमय रस्त्यावरून पांचगव्हाण येथून लग्नाहून अडगाव येथील इसम येत होता तर तेल्हारा कडून अडसूळ कडे वाकोडी येथील इसम जात होते समोर जात असलेल्या ट्रकला ओव्हर टेक करण्याच्या नादात दोन्ही गाड्या पारस्परांना धडकल्या क्षणात होत्याचे नव्हते झाले.
या अपघातात दोन्हीही बाईक स्वारांना गंभीर दुखापत झाली घटनास्थळावर खूप प्रमाणात रक्तस्त्राव झालेला दिसून येतो.सदर अपघाताची बातमी तेल्हारा पोलीस स्टेशनला कळताच पोलीस निरीक्षक दिनेश शेळके यांच्या मार्गदशनात पो. कॉ. निकेश सोळंके तथा सागर मोरे तातडीने घटनास्थळावर पोहचून जखमीना तात्काळ ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे उपचारासाठी दाखल केले.
कुंभाकर्णी झोपेचे सोंग घेतलेल्या संबंधित रस्त्याच्या यंत्रणेला आता तरी जाग येईल का? कि अजून किती अपघात घडण्याची संबंधित यंत्रणा वाट पाहत आहे, या रस्ते अपघातात कित्येक तरी लोकांचे संसार उद्वस्थ झालेत कित्येक मुले पोरकी झालीत तर कित्येक महिला विधवा झाल्यात,
कित्येक वृद्ध माता पित्यांचा आधार गेला तरी पण या झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनास जाग येईना असा जनमानसात नाराजीचा सुर उमटत आहे.