बोंडगाव देवी रस्त्यावर मध्यरात्री आढळले दोन बिबट, व्हिडिओ व्हायरल…

गोंदिया – अमरदिप बडगे

साकोली मार्गावरील बोंडगाव ते निमगाव दरम्यान मध्यरात्री प्रवासादरम्यान दोन बिबटे आढळल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. प्रवाशांनी या दोन्ही बिबट्यांचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर वायरल केले आहे. परिसरात बिबट्यांची संख्या वाढत आहे.वनविभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

अर्जुनी मोरगाव तालुका हा जंगलव्याप्त आहे.नवेगाव नागझिरा हे वन्यजिवांच्या संरक्षणासाठी बफर झोन घोषित करण्यात आले.यामुळे तालुक्यातील जंगलामध्ये वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे.जंगल व्याप्त परिसराला लागून तालुक्यातील अनेक गावे आहेत.परिणामी मानव आणि वन्यजीव संघर्ष नेहमी पाहायला मिळतो.बोंडगाव देवी नजीक श्याम चांडक यांच्या राईस मिल जवळ प्रवाशांना रात्री साडेअकरा वाजता दरम्यान दोन बिबट रस्त्याच्या मधोमध पाहायला मिळाले.

प्रवाशांनी या बिबट्यांचा मोबाईल ने व्हिडिओ तयार केला आणि परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन केले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे .शुक्रवार 8 ऑक्टोंबर ला बोंडगाव नजिक चांन्ना येथील 32 वर्षीय शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला चढवून त्याला जखमी केल्याची घटना घडली.या हिंस्र प्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here