नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेड जिल्ह्यातील विविध सज्जाचे तलाठी सन 2017 मध्ये पदोन्नती होऊन मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत झाले होते.परंतु अचानक जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशामुळे या वीस मंडळाधिकाऱ्यांना कार्यमुक्त करून पुन्हा तलाठी पदावर रुजू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी काढले आहेत.
महसूल विभागातील ही पहिलीच घटना असल्याचे मंडळ अधिकाऱ्यातून बोलले जात असून या आदेशा विरुद्ध मंडळ अधिकाऱ्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मंडळ अधिकारी पदी नियुक्ती देताना तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व आस्थापना विभागाचे कर्मचारी तसेच जिल्हाधिकारी यांनी कोणत्या निकर्षाद्वारे पदोन्नती दिली होती असा सवाल मंडळ अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशात असे नमूद केले आहे की, मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई यांचेकडील मुळ अर्ज क्र. 354/2015 मधील निर्णय दि. 02/02/2017 च्या अनुषंगाने मा. विभागीय आयुक्त औरंगाबाद यांचेकडील पत्र दि. 08/03/2019 मधील निर्देशानुसार या जिल्हा आस्थापनेवरील तलाठी संवर्गाची पदोन्नतीसाठी प्रारूप जेष्ठता सूचि दि.29.09.2020 व अंतिम जेष्ठता यादी दि. 22.12.2020 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
सदरील यादी तयार करताना मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार शासन राजपत्र महसुल व वन विभाग क्र. परिक्षा 1093/प्र.क्र.269/ई-10 दि. 29/10/1997 व शासन राजपत्र, महसुल व वन विभाग अधिसूचना क्र. संकीर्ण 1093/प्र.क्र. 02/ई-10. दि. 04/06/1998 अन्वये देण्यात आलेले निर्देश विचारात घेण्यात आले आहे. सदरील यादीचे अवलोकन करून विभागीय पदोन्नती समितीने मान्यता दिली आहे.
त्यानुसार मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई यांचेकडील मुळ अर्ज क्र. 354/2015 मधील निर्णय दि. 02/02/2017 च्या अनुषंगाने मा. विभागीय आयुक्त औरंगाबाद यांचेकडील पत्र दि. 08/03/2019 मधील निर्देशानुसार या जिल्हा आस्थापनेवरील तलाठी संवर्गाची पदोन्नतीसाठी अंतिम जेष्ठता यादीमुळे 20 कर्मचारी यांचा जेष्ठता क्रम बदल्यामुळे कनिष्ठ जागेवर आल्यामुळे असे कर्मचारी आज रोजीच्या विभागीय पदोन्नतीच्या बैठकीच्या विचारक्षेत्राच्या यादीत येत नसल्यामुळे अशा 20 मंडळ अधिकारी याना त्यांचे मुळ सवर्गात म्हणजेच तलाठी संवर्गात पदावनत करून त्यांना तलाठी संवर्गात पदस्थापना देण्याचा निर्णय विभागीय पदोन्नती समितीने घेतला आहे.
सर्व संबंधित कार्यालय प्रमुख यांना आदेशित करण्यात येते की, वरील नमुद कर्मचा-यांना कार्यमुक्त करणे व रुजू करुन घेणेची कार्यवाही तात्काळ करावी व तसा अनुपाल अहवाल सादर करावा. सर्व संबंधीत
उपविभागीय अधिकारी यांनी संबंधीत तलाठी यांना त्यांचे स्तरावरून सज्जावर नेमणूक करणेसाठी यथोचित आदेश निर्गमित करावेत, तसेच ज्या तलाठयाना मुळ उपविभागात पदस्थापना देणे शक्य होत नसल्यामुळे इतर उपविभागात
पदस्थापना देण्यात आली आहे. तथापि, त्याची जिल्हास्तरावरील तलाठी संवर्गाची जेष्ठता कायम ठेवण्यात येत आहे. सदर आदेश तात्काळ अंमल द्यावा असे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांनी 13 मे रोजी काढलेल्या आदेशात म्हंटले आहे.महसूल विभागातील ही पहिलीच घटना असल्याचे समजते