बाडमेरमध्ये बस आणि टँकरची धडक, १२ जण जिवंत जळले…

न्युज डेस्क – राजस्थानमधील बारमेर-जोधपूर महामार्गावर बुधवारी मोठा अपघात झाला. खासगी बस आणि टँकरमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेमुळे टँकर आणि बसला आग लागली, त्यात १२ जण जिवंत जळाले. या दुर्घटनेत अनेक जण जखमीही झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

हा अपघात झाला तेव्हा बसमध्ये २५ जण होते, असे सांगण्यात येत आहे. धडकेनंतर बसने पेट घेतला. यामुळे लोक त्यात अडकले, काही लोक खिडकी तोडून बाहेर आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून १० जणांची सुटका केली. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातामुळे महामार्गावर बराच वेळ जाम झाला होता, त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बसमधील प्रवाशाने सांगितले की, बस बालोत्रा ​​येथून सकाळी दहाच्या सुमारास निघाली होती. महामार्गावर चुकीच्या दिशेने येणाऱ्या टँकरने बसला धडक दिली, त्यात आग लागली आणि संपूर्ण बस खाक झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here