महामार्गावरील कुडे गावात आढळला बारा फुटी अजगर…

सर्पमित्रांनी दिले अजगराला जीवदान.

मनोर – पालघर तालुक्यातील मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या कूडे गावच्या भोवर पाड्यात महेंद्र भोवर यांच्या घराजवळ बुधवारी (ता.07) अजगर आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अजगराची माहिती पाड्यातील ग्रामस्थांनी दहिसर तर्फे मनोर वनपरिक्षेत्राचे कर्मचारी आणि सावरखंड गावातील सर्पमित्र महेंद्र गोवारी यांना दिली होती.त्यानंतर सर्प मित्रांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत उमेश भोवर यांच्या घरा शेजारील भागात शोध घेऊन शिताफीने अजगराला पकडले.

अजगराची लांबी बारा फूट असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली.त्यानंतर अजगराला वाघोबा खिंडीतील जंगलात सोडून देण्यात आले.सर्पमित्र महेंद्र गोवारी यांच्यासह नितेश तांडेल,राहुल तारवी, अरुण खरपडे, वसीम मलिक, सागर दिवाकर आणि नितेश डुकले यांनी अजगराला जीवदान दिल्याने पंचक्रोशीत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here