बारावीचा निकाल ‘या’ तारखेला लागणार?…जाणून घ्या

न्यूज डेस्क – राज्य माध्यमिक शिक्षण मंडळा नुकताच 10 वी निकाल लागल्यानंतर आता सर्वांचे लक्ष बारावीच्या निकालाकडे लागले असून येत्या दोन तीन दिवसात १२ वी चा लागण्याची शक्यता आहे. दहावीच्या निकालादरम्यान राज्य सरकार शिक्षण विभागाची वेबसाईट बंदच असल्याने विद्यार्थ्यांना निकाल बघण्यास झालेली अडचण झाली होती. यावेळेस बारावीच्या निकालाच्या दिवशी अशी अडचण विद्यार्थ्यांना येणार नाही असा प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे. 

तर राज्याचा बारावीचा निकाल येत्या 21 जुलैला लागण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे बारावीचा निकाल उशिरा लागत आहे.

बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. मात्र अखेर बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दहावीप्रमाणे बारावीचा निकालही विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात येणार आहे.

40:30:30 या फॉर्म्युल्यानुसार निकाल लावण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या दहावी आणि अकरावीच्या मार्कांना प्रत्त्येकी 30 टक्के वेटेज आहे. तसंच बारावीच्या वर्षांतील अंतर्गत परीक्षा, असायमेन्टस यांना 40 टक्के वेटेज असणार आहे. यावरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here