Breaking | उमरी मंदिर येथे इलेक्ट्रॉनिक डीपीला शॉर्टसर्किट झाल्याने गावातील १०० ते १५० घरातील टीव्ही फॅन फ्रिज जळून खाक…

१५ ते २० लाखाचे नुकसान :- महावितरणचा भोंगळ कारभार

दर्यापूर – किरण होले

दर्यापुर तालुक्यातील कोकर्डा फाट्या पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरी मंदिर या गावात सुमारे पंधराशे च्या आसपास लोक राहतात. या गावातील नागरिकांनी महावितरण कार्यालय दर्यापूर येथे गावातील मुख्य इलेक्ट्रॉनिक डीपी दुरुस्त करण्यासंदर्भात वारंवार निवेदने तक्रारी दाखल केल्या होत्या.

व गावात एका वायरमन ची नेमणूक करण्यात यावी अशी सुद्धा मागणी करण्यात आली होती परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून या गावाला इलेक्ट्रॉनिक वायरमन नसल्याने गावातील नागरिकांना अंधारात राहावे लागले. येत्या काही दिवसात अखेर वायरमेन ची नेमणूक करण्यात आली.

परंतु तो वायरमन दोन ते तीन महिने गावात हजर नसतो असा आरोप गावकरी करीत आहे. शुक्रवार रोजी दुपारी दोनच्या सुमारास वायरमन हा मुख्य डीपी वर चढून त्याने गावातील लाईट बंद करू डीपी चे काही इलेक्ट्रिक काम केले. परंतु डीपीवर अर्थिंग न लावल्याने मोठ्या प्रमाणात शॉर्टसर्किट झाली.

व या शॉर्टसर्किट मुळे गावातील सुमारे शंभर ते दीडशे घरातील टीव्ही, फॅन फ्रिज, वाशिंग मशीन, झेरॉक्स प्रिंटर, आधी इलेक्ट्रॉनिक वस्तू शॉर्टसर्किटने पुर्णत नष्ट झाले. यात सुमारे अंदाजे पंधरा ते वीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

सदर घटना घडताच गावकऱ्यांनी डीपीवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती जोपर्यंत नुकसान भरपाई मिळणार नाही तोपर्यंत आम्ही वायरमन ला गावाबाहेर जाऊ देणार नाही अशी ठाम भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती. यात महावितरणाचा पूर्ण चा भोंगळ कारभार असल्याचे दिसून येत आहे.

सदर घटनेची माहिती येवदा पोलीस स्टेशनला कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गावातील वातावरण शांत केले.दर्यापूर येथून महावितरनाचे उपकार्यकारी अभियंता सी एन. मोहोकार यांनी गावकऱ्यांना शांत करून चौकशीअंती कारवाई करू असे आश्वासन दिले . सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here