आपत्कालीन परिस्थितीत कोरोना लसीची कॉलर ट्यून अशी करा बंद…

फोटो - सोशल मिडिया

न्यूज डेस्क – देशात कोविड लसीची विक्रमी नोंद करण्यात आहे. काल अडीच कोटी लोकांना लस मिळाली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Twitt करून माहिती दिलीय तर अजुही बरेच लसीकरण होणे बाकी असल्याने लसीकरणाची जनजागृती व्हावी म्हणून सरकारकडून मोबाईल कॉलर ट्यून सुरु केलीय. आपण जेव्हा पण कोणाला कॉल लावतो तेव्हा सर्वप्रथम ही ट्यून ऐकवली जाते. पण कधीकधी खूपच आपात्कालीन वेळेस ह्या ट्यूनचा कंटाळा वाटतो, तर तेव्हा आपण ह्या हॅलो ट्यून ला बंद करू शकतो.

यासाठी आपण जेव्हा कॉल लावतो तेव्हा ही कॉलर ट्यून / हॅलो ट्यून सुरू झाल्यावर आपल्याला आपल्या कॉलिंग डायल पॅड करून “एक” (1) हा क्रमांक डायल करावा लागेल. ज्यामुळे ही ट्यून तिथेच संपेल अन आपला कॉल हा पुढे सुरू राहील.

हा कायमस्वरूपी उपाय नाहीये, ही कृती परत परत कॉल लावताना करावी लागेल. पण अडीअडचणीच्या वेळी आपण ह्या युक्तीचा उपयोग करू शकता, जेणेकरून आपला वेळ वाचेल व आपल्याला आपली महत्वाचे काम करता येईल.

एअरटेल, वोडाफोन, जिओ, बीएसएनएल क्रमांकावर कोरोना कॉलर ट्यून कसे बंद करावे, येथे दोन मार्ग आहेत

एअरटेल क्रमांकावर कोरोना कॉलर ट्यून कसे बंद करावे
जर तुमच्याकडे एअरटेल नंबर असेल तर *646 *224# डायल करा आणि नंतर 1 दाबा.
कोरोना ट्यून ऐकताच * किंवा 1 दाबण्याचा दुसरा मार्ग आहे.

व्होडा-आयडिया नंबरवर कोरोना कॉलर ट्यून कसे बंद करावे
144 वर CANCT पाठवा किंवा कोरोना ट्यून ऐकताच * किंवा 1 दाबा.

जिओ नंबरवर कोरोना कॉलर ट्यून कसे बंद करावे
STOP लिहा आणि 155223 वर पाठवा किंवा कोरोना ट्यून ऐकताच * किंवा 1 दाबा.

बीएसएनएल क्रमांकावर कोरोना कॉलर ट्यून कसा बंद करावा
UNSUB 56700 किंवा 56799 वर पाठवा

टीप- यापैकी, आम्ही स्वतः एअरटेल आणि जिओचे कोड वापरून पाहिले आहेत, जे योग्य ठरले आहेत. एअरटेलच्या नंबरने * किंवा 1 दाबल्याने ट्यून बंद होते. सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या दाव्याच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालाचा हेतू सरकारच्या कोरोना जनजागृती मोहिमेत अडथळा आणणे नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here