शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित तुलसीदास खिरोडकार…

दानापूर – गोपाल विरघट

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग,अकोला आयोजित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग,अकोला यांचे तर्फे शिक्षक दिनानिमित्त शिक्षक सन्मान सोहळा पार पडला. या कार्यक्रमात जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांचा शाल, श्रीफळ,सन्मान चिन्ह, सन्मान पत्र देऊन कार्य गौरव करण्यात आला.

यामध्ये तेल्हारा तालुक्यातील प्रयोगशील शिक्षक, बालरक्षक तुलसीदास खिरोडकार यांना जिल्हास्तरीय शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सन २०२१-२२ करिता तेल्हारा तालुक्यातील अमोल ढोकणे,गुलाम मुस्तफा खान व सन २०२०-२१ करिता मंगेश पवार,राजेश चित्ते, मो.इम्तियाज अ. सईद या सर्व उपक्रमशील शिक्षकांचा कृतिशील शिक्षक या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री, आमदार डॉ.रणजित पाटील,ऍड.मोतीसिंह मोहता,माजी शिक्षक आमदार वसंतराव खोटरे यांचे शुभहस्ते व मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आला.यावेळी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर, तेल्हारा तालुकाध्यक्ष सुभाष ढोकणे,सेवा निवृत्त मुख्याध्यापक गोपाल भुजबुले,मनोहर शेळके, देवमन रौदळे,

मो.युसूफ मो.युनूस, दीपक दही,भारत तायडे, मनीष गिऱ्हे, अरुण निमकर्डे, राजेश वानखडे, ओमप्रकाश उगले, खलील सर, नामदेव केंद्रे,अजय गोठकडे, सचिन ठोंबरे,श्याम पाठक, दीपक पोके, मिलिंद खिराडे, विजय इंगळे,अनंतकुमार तायडे,रामदास बनकर,रामेश्वर भोंगाळे, प्रकाश ढोकणे, विजय ढोकणे, नवनाथ कोरडे,संजय वानखडे, सोहन दामधर,शैलेंद्र भोपळे,प्रवीण चिंचोळकार, अर्चना खिरोडकार,

माया काळपांडे, वैशाली चित्ते श्रीकृष्ण वाकोडे, पर्यावरण समिती जिल्हाध्यक्ष मोहसीन सर, देविदास कोहरे,प्रशांत थोरात, दीपक खंडेराव,ओमप्रकाश निमकर्डे, संदीप भड, गोपाल गिऱ्हे,तेजराव वाकोडे,राजेंद्र दिवनाले,उमेश तिडके,अमोल राखोंडे,गोपाल मोहे, निखिल गिऱ्हे,

सय्यद जव्वाद हुसेन,सय्यद खलील,राजू कुरेशी,नाजीमोद्दिन नासिरोद्दीन, आदिल मोहम्मद, अब्दुल मजिद, मोहम्मद एजाज, इद्रीस अली, मोहम्मद इक्बाल, आसिफ शहा, मोहम्मद फारुक, व विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, तालुका-जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here