शौचालयाच्या खड्ड्यात पडलेल्या १० वर्षीय मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात ४ जणांचा मृत्यू…सरकारकडून मदत जाहीर…

न्यूज डेस्क :- उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे शौचालयाच्या खड्ड्यात पडलेल्या दहा वर्षांच्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात संबंधित मुलासह पाच जणांचा मृत्यू झाला.आग्राच्या फतेहाबाद पोलिस ठाणे परिसरात ही घटना घडली. आग्रा येथील वरिष्ठ पोलिस अधीक्षक बबलू कुमार यांनी सांगितले की, दहा वर्षांचा मुलगा खेळाच्या दरम्यान शौचालयात असलेल्या खड्ड्यात पडला, चार जण एकामागून एक खड्ड्यात पडले आणि ते बेशुद्ध पडले.

ते म्हणाले की, सर्वांना खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले आणि त्यांना फतेहाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे एकाचा मृत्यू झाला. उर्वरित चौघांनाही गंभीर अवस्थेत आग्रा येथे हलविण्यात आले व तेथेच तिघांचा मृत्यू झाला.

या घटनेवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र व्यथा व्यक्त करीत मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अधिकृत निवेदनानुसार मृतांच्या कुटूंबियांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत आणि निधन झालेल्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी शोकग्रस्त कुटुंबांबद्दल शोक व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here