सतत शिंका येणं किंवा सर्दी होत असेल तर ‘कोरोना’ ची भीती बाळगण्यापेक्षा हे उपाय करून बघा…

न्यूज डेस्क – सतत शिंका येणं किंवा सर्दी होत असेल तर ‘कोरोना’ची भीती वाटत असेल तर घाबरण्याचं काहीही कारण नाही. ऋतू बदल झाल्याने वातावरणातील अनेक बदल होतात त्यामुळे काही लोकांना सतत सर्दी किंवा शिंक येण्याचा त्रास होतो.

अशा लोकांसाठी आज आपण काही उपाय जाणून घेणार आहोत .

1 ) आवळ्याचा रस – तुम्हाला शिंका येण्याची समस्या असेल तर 15 दिवस आवळ्याचा रस नियमित प्या यामुळं ही समस्या दूर होते .

2 ) लिंबू आणि मध – लिंबू आणि मधाच्या सेवनानं सर्दी – खोकल्याला आराम तर मिळतोच, शिवाय यामुळे तुम्हाला दुहेरी फायदा मिळतो. सकाळी उठल्याबरोबर पाण्यासोबत याचं सेवन केलं तर लठ्ठपणा कमी होतो .

शरीरातील चरबी कमी होते. सर्दी खोकल्याचा त्रासही कमी होतो. एक ग्लास कोमट पाण्यात किंवा गरम दूधात दोन चमचे मध आणि एक चमचा लिंबाचा रस टाकून पिल्यानंतर खूप फायदा होतो .

3 ) आल्याचा चहा सर्दी खोकल्यासाठी चांगला असतो. यानं घसा शेकून निघतो. यामुळं सर्दी खोकल्यात काही प्रमाणात नक्कीच आराम मिळतो .

4 ) लसूण – प्रत्येकाच्या घरता लसूण असतो. यात एलिसिन नावाचं रसायन असतं जे अँटी बॅक्टेरियल, अँटी व्हायरल आणि अँट फंगल असतं. सर्दी – खोकल्याचा त्रास असेल तर लसणानं हा त्रास लवकर बरा होतो .

5 ) तुळस आणि आलं – याच्या सेवनानं सर्दी खोकल्याला लगेच आराम मिळतो. त्यामुळं हा उत्तम उपाय मानला जातो. एक कप गरम पाण्यात तुळशीची पानं आणि आल्याचा एक तुकडा टाकून हे पाणी काही वेळ उकळू घ्या. हे पाणी अर्ध झाल्यानंतर या पाण्याचं म्हणजेच काढ्याचं सेवन करा, तुम्ही लहान असो वा मोठे सर्वांसाठी हा काढा उपयोगी ठरतो

कसा तयार करायचा चहा?

  • सर्व प्रथम गॅसवर पाणी गरम करत ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये किसलेले आले मिक्स करा आणि दोन मिनिटांसाठी पाणी उकळू द्या.
  • यानंतर पाणी गाळून थंड होण्यास ठेवून द्या आणि चहा थंड झाल्यानंतर त्यात मध मिक्स करा. तुमचा मध आणि आल्याचा चहा तयार झाला आहे. सर्दीची समस्या दूर करण्यासाठी या चहाचे आपण दिवसातून दोनदा सेवन करू शकता.

​गुळण्या करा आणि गरम पाण्याची वाफ घ्या

  • सर्दी आणि खोकला झाल्यानंतर आपण गरम पाण्याच्या गुळण्या केल्यास आणि गरम पाण्याची वाफ घेतल्यासही आराम मिळेल.
  • सर्दीमुळे घसा खवखवत असेल किंवा घसा दुखत असेल तर गरम पाण्यामध्ये मीठ टाका आणि या पाण्याने गुळण्या करा.
  • सर्दीमुळे नाक बंद झाले असल्यास गरम पाण्याची चेहऱ्यावर वाफ घ्या. हा उपाय केल्यास शरीरात जमा झालेला कफ बाहेर पडेल. श्वासोच्छवास करताना त्रास होणार नाही. घशातील खवखव तसंच वेदना, डोकेदुखीचाही त्रास कमी होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here