शेगाव संस्थानचे विश्वस्त कर्मवीर शिवशंकर भाऊ पाटील याचं निधन…

फोटो- सोशल मिडिया

न्यूज डेस्क – श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचे काही वेळा पूर्वीच दुःखद निधन झाले आहे. मृत्युसमयी त्यांचे वय 82 वर्ष होते आज बुधवार, ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने शेगावनगरीसह संपूर्ण विदर्भावर तसेच श्री भक्तांवर शोककळा पसरली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून मल्टीऑर्गन फेल्यूअरमुळे शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यांच्या सांगण्यानुसार त्यांच्यावर घरीच वरिष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात उपचार करण्यात आले. त्यांना कमी रक्तदाबाचा त्रास होता. त्यामुळे शहरातील डॉक्टरांसह बुलडाण्यातील डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान बुधवारी सायंकाळी पाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, पत्नी तसेच नातवंडे, असा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने श्री भक्तांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. कोरोनाचे निर्बंध असल्याकारणाने अंत्यविधीसाठी मोजक्याच भक्तांना परवानगी असल्याने शेगाव येथे कोणीही गर्दी करु नये असे शेगाव संस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here