पातुर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पोट निवडणुकीचे बिगुल वाजले…

सर्वच राजकीय पक्षांची ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना प्रती सहानुभूती वाढली…

जिल्हा परिषदेच्या एका सदस्यासह तीन पंचायत समितीच्या सदस्यांचे पदे खारीज झाल्याने सत्ता समीकरण मध्ये परिवर्तनाची चिन्हे…

पातुर – निशांत गवई

पातुर तालुक्यातील ग्रामीण विभागांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग वाढला आहे तालुक्यातील ग्राम बाभुळगाव येथील वंचित आघाडीचे जिल्हा परिषद सदस्य सुनिल फाटकर शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य तथा गटनेता अजय ढोणे ,राष्ट्रीय काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्य तथा उपसभापती नजमुन्निसा मोहम्मद इब्राहिम,

वंचित आघाडीच्या पंचायत समिती सदस्य सुनिता टप्पे, आदि चा जिल्हा परिषद तथा पंचायत समितीच्या सन 2020 च्या निवडणुकीमध्ये अतिरिक्त ओबीसी आरक्षणातून निवडणुकीत विजय झाला होते मात्र मा उच्च न्यायालयाच्या निकालानुसार जिल्हा परिषद च्या एका सदस्यांसह तीन पंचायत समितीच्या सदस्यांची पदे खारीज करण्यात आल्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली होती.

तर अकोला जिल्हा परिषद आणि पातुर पंचायत समितीच्या सत्ता समीकरणांमध्ये सुद्धा परिवर्तनाची चिन्हे व्यक्त होत असल्याची चर्चा होती पातुर पंचायत समिती मधीलगेल्या 20 वर्षाच्या भारिप च्या सत्तेला तडा गेला होताएकूण 12 सदस्यांपैकी 6 शिवसेना ,5 भारीप, राष्ट्रीय काँग्रेस 1अशी स्थिती होती तर सत्तास्थापनेसाठी राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना यांची युती करून शिवसेनेच्या लक्ष्मीबाई डाखोरे.

या सभापतीपदी तर राष्टीयकाँग्रेसच्या नजमुन्निसा मोहम्मद इब्राहिम या उपसभापतीपदी तर पंचायत समितीचे गटनेते म्हणून शिवसेनेचे अजय ढोणे आदी पदावर विराजमान झाले होते मात्र अल्पावधीतच शिवसेना 1, वंचित आघाडी1, एक राष्ट्रीय काँग्रेस अशा तीन सदस्यांची संख्या कमी झाल्याने पातूर पंचायत समितीमधील सत्ता समीकरणांमध्ये बदल घडण्याची चर्चा होती त्यामुळे सद्यस्थितीत होणारी पोटनिवडणूक शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्यासाठी आव्हानात्मक असून,

या पोटनिवडणुकीत प्रयत्नाची पराकाष्टा करणार असल्याचे बोलले जात आहे तर पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नसल्याने भाजपा भुईसपाट झाली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा अशीच दयनीय स्थिती झाली असल्याने भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासाठी सदरची पोटनिवडणूक चुरशीची ठरली असून दोन्ही पक्षाचे लोकप्रतिनिधी कार्यकर्ते पदाधिकारी जोमाने कामाला लागले.

असून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पोट निवडणुकीला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्षांची ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना प्रती सहानुभूती वाढली असल्याचे चित्र आहे (पोटनिवडणुकीमध्ये 29 जून 2021 पासून तर 5जुलै पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अवधी असून 6 जुलैला नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे नामनिर्देशन परत घेण्याची अंतिम तारीख 12 जून 2021 असून 19 जुलैला 2021 ला प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून पोटनिवडणुकीचा निकाल 20 जुलै 2021 ला करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here