ट्रक ऑटो चा भीषण अपघात; नवविवाहिता जागीच ठार; सासु सासरे जखमी…

चिखली – राहुल गवई

चिखली तालुक्यातील घटना ट्रक आणि ऑटो च्या भीषण अपघातात नवविवाहिता जागीच ठार तर सासु सासरे जखमी झाले. हि घटना आज ९जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चिखली खामगाव रोडवरील बोरगाव वसु गावाजवळ घडली.शीतल मंगेश होगे(२०) रा दहिगाव ता चिखली असे ठार झालेल्या विवाहितेचे नाव आहे.तर सासरे भास्कर होगे(५५) आणि सासु लता होगे(५०) हे जखमी झाले आहेत.

तिघेही दहिगाव येथील ऑटोतच चिखली वरून दहिगाव कडे ऑटो क्र एम एच २८,एच ४७२३ ने चालले होते.बोरगाव वसु गावाजवळ ट्रक एमएल ०१,एडी ११८७ ला ओव्हर टेक करण्याचा प्रयत्नात ट्रक चा धक्का ऑटो ला लागला.त्यामुळे ऑटोत बससलेल्या शीतल होगे ह्या बाहेर पडुन ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला.सासु आणि सासुरे जखमी झाले असुन त्यांच्यावर चिखली येथे उपचार सुरू आहेत.शीतल चे २८ मे रोजी लग्न झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here