गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण…पातूर येथे श्रीराम सेना व माजी सैनिक संघटनेचा पुढाकार…

पातूर तालुका प्रतिनिधी… गेल्या आठवड्यात पूर्व लडाख सीमेवरील गलवान खोऱ्यात सीमेवर गस्त घालणाऱ्या भारतीय सैनिक आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट होऊन या झटापटी मध्ये भारतीय सैन्यातील आपल्या वीस जवानांना आपले प्राण मुकावे लागले असून त्यांना वीरमरण आले आहे.

या वीर जवानांना पातूर येथे श्रीराम सेनेतर्फे व माजी सैनिक संघटनेतर्फे नुकताच एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम सीदाजी महाराज व्यायाम शाळा पातुर येथे आयोजित करण्यात येऊन त्या वीस शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली..

माझी सैनिक संघटनेचे अध्यक्ष तुकाराम निलखन यांनी श्रद्धांजलीपर दोन शब्द वीर जवान बद्दल माहिती सांगून श्रद्धांजली अर्पण केली ,तसेच शिरल्याचे ग्राम विकास अधिकारी राहुल उंदरे यांनी सुद्धा शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली..

यावेळी श्रीराम सेनेचे विदर्भ संघटक मंगेश गाडगे माजी सैनिक देविदास निमकडे, प्रशांत निलखन ,अंबादास टप्पे, अरुण राऊत, अशोक कोथळकर, गोपाल हरणे, रवींद्र श्रीनाथ, महादेवराव परमाळे , शैलेश सिंह बायस धीरज परिहार विशाल खुरसडे,यांची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here