Monday, May 27, 2024
Homeराज्यकन्हान शहर विकास मंच द्वारे शहिदांना श्रद्धांजली...

कन्हान शहर विकास मंच द्वारे शहिदांना श्रद्धांजली…

रामटेक – राजु कापसे

जम्मू – काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या शूर जवानांना कन्हान शहर विकास मंच च्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भारतीय सुरक्षा जवानांना घेऊन जाणाऱ्या सीआरपीएफ वाहनांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला.

ज्या मध्ये देशाचे ४० हून अधिक शुर जवान शहीद झाले होते . जम्मू-काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा जवळील लेथपोरा भागात हा हल्ला झाला होता. दि.१४ फेब्रुवारी ला या दहशतवाद्यांच्या हल्ल्याला चार वर्षे पूर्ण झाल्याने कन्हान शहर विकास मंच च्या वतीने तारसा रोड शहीद चौक येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच मार्गदर्शक भरत सावळे, शिक्षक शैलेश सोलंकी यांच्या हस्ते शहिद प्रकाश देशमुख यांच्या प्रतिमेला आणि स्मारकावर पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात केली. मंच पदाधिकाऱ्यांनी शहीद प्रकाश देशमुख आणि स्मारकावर पुष्प अर्पित करुन व दोन मिनिटाचा मौन पाळून शहिद झालेल्या शुर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , प्रदीप बावने , महेर इंचुलकर , राहुल सोनबरसे , अर्जुन पात्रे , रंजनिश मेश्राम , कु.अनु मेश्राम , सुनिल हारोडे , शुभम नागमोते , हर्षल नेवारे , श्रवण पात्रे , हर्षल ठाकरे , उमेश मेश्राम , बादल मडावी सह आदि नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते .

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments