अतिक्रमण करण्यासाठी शासनाकडून कुठलीही परवानगी नाही…
दर्यापूर – किरण होले
दर्यापूर तालुक्याच्या अगदी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गायवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गणेशपूर गावाजवळ शासनाची तब्बल हजारो मीटर जागा ही गावठाण म्हणून घोषित केली आहे . या जागेवर फक्त गावातील गुरेढोरे यांच्या चारा साठी राखीव करण्यात आली आहे.
परंतु रविवार रोजी सायंकाळी मध्यरात्रीच्या सुमारास कुणालाही आता पता न लागू देता. या गावठाण जागेवर तब्बल ७८ आदिवासी (पारधी) कुटुंबांनी अतिक्रमण केले आहे. विशेष म्हणजे सर्वांनी आपापली जागा चू यान्याने आखून राखीव सुद्धा करून घेतली आहे. व त्या जागेवर आपला हक्क असल्याचे आता आदिवासी बांधव सांगित आहे.
सदर घटनेची माहिती गावातील लोकांना सोमवार रोजी सकाळी कळताच लोकांनी तातडीने पोलीस स्टेशन, व तहसीलदार यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करून गावठाण जागेवर केलेले आदिवासी लोकांचे अतिक्रमण त्वरित काढण्यात यावी गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर घटनास्थळी तहसीलदार योगेश देशमुख,

ठाणेदार आत्राम साहेब, सहायक गटविकास अधिकारी सुधीर अरबट यांच्यासह पोलीस प्रशासनाचे सर्व अधिकारी-कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आदिवासी बांधवांना विनापरवाना शासकीय जागेवर केलेले अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे असे सांगितले असता आदिवासी बांधव आपल्या महिला सह त्याच जागेवर ठिय्या मांडून ठाम आहे.
तब्बल दोन तास चाललेल्या चर्चेदरम्यान कुठलाही तोडगा निघाला नसल्यामुळे अखेर ग्रामपंचायतच्या सचिवाकडून आता पोलीस स्टेशन येथे शासकीय जागेवर केलेले विनापरवाना अतिक्रमण काढण्यात यावे अशी तक्रार दाखल करणे सुरू आहे. जर आदिवासी बांधवांनी तेथील अतिक्रमण तात्काळ काढले नाही तर शासकीय नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल . असे ग्रामपंचायत सचिव निरंजन गायगोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.