पातूर | मळसुर येथील ग्रा प च्या सामाजिक वनीकरनाची १३ कोटी रुपयांची झाडे जमीनदोस्त

पोलीसांना तक्रार करूनही अद्याप कुठलीही कार्यवाही नाही…याकडे बाबीकडे प्रशासनाने गंभीर दुर्लक्ष…कारवाई न झाल्यास मळसूर येथील ग्रामस्थांनी दिला जिल्हाअधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा ईशारा…

पातूर :मळसुर ग्रा प च्या ताब्यात असलेली मळसुर गावंडगाव रोडवर शेकडो एकर शासकीय जमीन आहे.मागील आठवड्यात तेथील जमिनीवरील सीताफळ, निंब,जांभूळ,बिहाडा इ प्रकारची ४ ते ५ वर्षांपूर्वी लागवड केलेली झाडे अज्ञात समाजकंटकाने उपटून सदरील जमिनीवर वहीत करण्याच्या उद्देशाने नांगरटी केली असल्याची बाब उजेडात आली आहे ,मात्र एवढे गंभीर प्रकरण घडूनसुद्धा प्रशासन सुस्त आहे कुठल्याही प्रकारची त्यावर कार्यवाही न झाल्याने सम्पूर्ण गावकरी व निसर्गप्रेमी लोक प्रचंड नाराज झाले असून या प्रकरणाची तात्काळ दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी यांचे कार्यालयासमोर उपोषण करायला बसणार असल्याचे समजले

मागील आठवड्यात मळसुर येथील इ क्लास जमीन वहीत करण्यासाठी काही लोकांनी सामाजिक वनीकरण व पाणी फाउंडेशन ने अतिशय मेहनत घेऊन जगवलेली हजारो झाडे उपटून व ट्रॅक्टर च्या साह्याने नांगरटी करून जमीनदोस्त केली यापैकी सीताफळ या जातीच्या झाडांना यावर्षी खूप मोठया प्रमाणात फळे सुद्धा आली होती मात्र काही लोकांनी राजकीय पाठबळाच्या जोरावर सदरची ७० ते ८० एकर जमीन ज्यावर सामाजिक वनीकरण विभागाने १३ कोटी रुपये खर्च करून जगवलेली सर्व झाडे ट्रॅक्टर च्या साह्याने उध्वस्त केली आहेत.

मळसुर ग्रा प व पाणी फाउंडेशन च्या सर्व नागरिकांनी याबाबत ची तक्रार केली तसेच घटनास्थळी पंचनामा केला व अज्ञात व्यक्ती, ट्रॅक्टर वाहन,चालक,मालक व संबंधित जबाबदार व्यक्तीवर गुन्हे दाखल व्हावे यासाठी चान्नी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली,मात्र आद्यप सदर प्रकरणी कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही।
तसेच वन विभाग आलेगाव यांना सुद्धा काही देणे घेणे नसल्याचे गंभिर चित्र समोर आले.

करीता परत लवकरात लवकर या प्रकरणाची गंभीरपणे चौकशी करून दोषी असणारे वनविभागाचे कर्मचारी, ट्रॅक्टर वाहन,चालक ,मालक यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या राजकिय लोकांना सुद्धा यामध्ये सह आरोपी करावे, कारण शासनाचे १३ कोटी रुपये या प्रकरणी पाण्यात गेल्याचे उघड झाले आहे.दोषीविरुध्द
लवकर कार्यवाही करावी यासाठी पाणी फाउंडेशन व गावकरी मा जिल्हाधिकारी अकोला ,मा पोलीस अधीक्षक अकोला तसेच मा जिल्हा वनसंरक्षक अधिकारी अकोला गटविकास अधिकारी पातूर यांना भेटणार असल्याचे समजले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here