भंडाऱ्यात दिवसाढवळ्या खून…शुक्रवारी वॉर्डात घडला थरार…अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल…

भंडारा : अज्ञात व्यक्तींनी एका पायदळ जाणाऱ्या युवकावर धारदार शास्त्राने वार करून निर्घृणपणे खून केला. ही थरारक घटना शहरातील शुक्रवारी वॉर्डात दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

या हत्येने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीतीचे वातावरण पसरले आहे. भंडारा शहरातील दहा दिवसातील ही दुसरी हत्या आहे.


सुरज यादव (३४) असे मृतकाचे नाव आहे. मृतक हा नागपूर येथील असून तो मागील काही दिवसांपासून भंडारा येथे वास्तव्यास आहे.

आपशी रंजीशमधून ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती होताच भंडारा ठाण्याचे पोलीस निरीक्षक लोकेश काणसे हे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविणतात आला.

याप्रकरणी भंडारा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. १९ जूनला भंडारा शहरातील हेडगेवार चौकालगत खून झाला होता. दहा दिवसातील ही दुसरी घटना असल्याने शहरातील नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here