कोगनोळी येथून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांचे गांधीगिरी पद्धतीने केले स्वागत…

कोगनोळी – राहुल मेस्त्री

कोगनोळी तालुका निपाणी येथील पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाला बगल देऊन कोगनोळी गावातून चार चाकी ते सोळा चाकी पर्यंत अनेक वाहनधारक प्रवास करत असतात. यामुळे गावातील तीन ते चार नागरिकांचा बळी गेलेला आहे. या अवैध वाहतुकीसाठी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दोन वेळा निवेदन देखील सादर केले आहेत.

आज दिनांक २ फेब्रुवारी रोजी बेळगाव जिल्हा पंचायतीचे माजी उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोगनोळीतुन अवैद्य वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने त्यांचे स्वागत केले जात आहे. व इथून पुढे कृपा करून आमच्या गावातून प्रवास करू नका असे सांगण्यात येत आहे .तर पाहूया पंकज पाटील आणि मारुती कोळेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here