महाराष्ट्र सरकारने गुरुवारी मुख्य सचिव (विशेष) गृह विभाग अमिताभ गुप्ता यांच्यासह 50 हून अधिक आयपीएस अधिकाऱ्यांची बदली केली. गुप्ता आता पुण्याचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून काम पाहतील.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम २२(न)च्या तरतुदीनुसार पोलीस अधीक्षक व पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना पदस्थापना देण्यात आली आहे.
गुरुवारी सायंकाळी जारी केलेल्या शासकीय आदेशानुसार अधिका्यांना नवीन पदोन्नती देण्यात आल्या आहेत, तर उर्वरित अधिकाऱ्यांना अद्याप नवीन पदस्थापना मिळाल्या नाहीत.पुणे पोलिस आयुक्त के.आर. व्यंकटेशम यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक (विशेष ऑपरेशन्स) म्हणून बदली झाली आहे.
ठाणे शहर परिमंडळ-४चे पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांची बदली नांदेडचे जिल्हा पोलिस अधिक्षकपदी करण्यात आली आहे.विद्यमान जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांची नुकतीच वर्षांपूर्ती झाली आहे.