शुक्रवारपासून नागपूर दुरांतो, विदर्भ एक्स्प्रेससह या गाड्या धावणार…

न्यूज डेस्क – कोरोना काळात भारतातील रेल्वे सेवा ठप्प पडली होती मात्र आता पुन्हा रेल्वे रुळावर आणायचे प्रयत्न रेल्वे मंत्रालयाकडून होत आहे. यातच राज्यातील जनतेला काही प्रमाणात दिलासा देणारी घोषणा मध्य रेल्वेनं केली आहे. येत्या ९ ऑक्टोबरपासून (शुक्रवार) पाच एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.

डेक्कन क्वीन, इंद्रायणी, नागपूर दुरांतो, विदर्भ आणि सिद्धेश्वर एक्स्प्रेस या गाड्या ९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. या गाड्या करोना काळात विशेष ट्रेन म्हणून चालवल्या जाणार आहेत. त्यासाठी गुरुवार, ८ ऑक्टोबरपासून आरक्षण उपलब्ध होणार आहे. प्रवाशांनी रेल्वे गाडीत प्रवेश करताना, प्रवास करत असताना व उतरण्याच्या ठिकाणी करोनाच्या अनुषंगानं सर्व नियम पाळणे गरजेचे आहे, असं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

‘अनलॉक’ सुरू झाल्यापासून रेल्वे सेवा कधी सुरू होणार याकडं सर्वांचे लक्ष लागलं आहे. मुंबई लोकलबरोबरच एक्स्प्रेस गाड्यांचीही लोकांना प्रतीक्षा होती. सरसकट सर्व रेल्वे गाड्या कधी सुरू होणार याविषयी अद्याप कुठलीही स्पष्टता नसली तरी टप्प्याटप्प्यानं सेवा सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं दिसत आहे. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या गाड्या याच प्रयत्नांचा भाग असल्याचं बोललं जातं.

02105 मुंबई – गोंदिया सुपरफास्ट स्पेशल (दररोज)
02106 गोंदिया – मुंबई सुपरफास्ट स्पेशल (दररोज)

02105 / 02106 मुंबई – गोंदिया – मुंबई या रेल्वे ला सर्व थांबे व वेळ दैनंदिन असेलेल्या 12105/12106 मुंबई – गोंदिया – मुंबई रेल्वे प्रमाणे असतील.

Composition: 10 Sleeper Class, Five AC-3 Tier, Three AC-2 Tier, one First AC Class and 5 Second Class seating.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here