अकोला जिल्ह्यातील वाहतूक पोलीस अमालदारांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा…

शहर वाहतूक शाखेतील पोलीस अंमलदार तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत वाहतूक पोलीस अमालदारांसाठी पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे आदेशाने शहर वाहतूक नियंत्रण शाखा चे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी एक दिवसीय प्रशिक्षण वर्ग आयोजित केले आहे,

संपूर्ण जिल्ह्यातील वाहतूक पोलीस तसेच शहर वाहतूक पोलीस अंमलदार दोन सत्रात ह्या प्रशिक्षण वर्गात सहभागी होणार आहेत, दिनांक 9।1।21 रोजी जिल्ह्यातील अर्धे वाहतूक पोलीस अंमलदार व दिनांक 10।1।21 रोजी राहिलेले वाहतूक पोलीस अंमलदार ह्या प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी होणार आहेत,

आज सकाळी 11।00 वा पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांनी सदर कार्यशाळेला आपल्या मार्गदर्शनाने सुरवात केली, वाहतूक शाखेत नवीन बदलून आलेल्या पोलीस अंमलदारासाठी व जुन्या पोलीस अमलदाराची उजळणी व्हावी व त्यांना दैनंदिन कर्त्यव्य बजावत असतांना ह्या प्रशिक्षणाचा फायदा व्हावा,

ह्या उद्देशाने सदर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे। सदर प्रशिक्षण नागपूर शहर पोलीस मध्ये कार्यरत असलेले अतुल आगरकर ह्यांनी अतिशय तंत्रशुद्ध पध्दतीने देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here