कृषी विभागाच्या वतीने रब्बी हंगामासाठी प्रशिक्षण…

राजगुरूनगर ( पुणे ) : कोहिणकरवाडी ( ता.खेड ) येथे कृषी अधिकारी कार्यालयामार्फत रब्बी हंगाम सण २०-२१ अंतर्गत रब्बी ज्वारी,हरभरा ,कांदा आदी पिकांचे प्रशिक्षण उपविभागीय कृषी अधिकारी मनोज ढगे,तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्याची माहिती सहाय्यक कृषी अधिकारी किरण कानडे यांनी दिली.

रब्बी हंगामामध्ये कोहिणकरवाडी व तिन्हेवाडी या गावांमध्ये रब्बी ज्वारीचे पीक घेण्यात येते या वेळी ज्वारी पिकास बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक व त्याचे महत्व कृषी पर्यवेक्षक श्रीमती कविता रोडे यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

तसेच कृषी विभागाच्या इतर योजनांची माहिती मंडळ कृषी अधिकारी मांजरे यांनी दिली.यावेळी गावातील कृषिमित्र शरद कोहिनकर प्रगतशील शेतकरी किसन कोहिनकर महादू मुळे गुलाब कोहिनकर कोंडीबा कोहिनकर इतर शेतकरी वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here