त्या अमानवीय घटनेचा दुःखद निषेध…!

बुलढाणा – अभिमान शिरसाट

मौजे रायपुर जिल्हा बुलढाणा येथील 16 वर्षीय मुलगी कु.सपना अंबादास जमधडे हिचा दि. ७/११/२०२० रोजी अमानवीय पद्धतीने खून करण्यात आला. या दुःखद घटनेचा जन कल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्राच्या राज्य उपाध्यक्षा संगमित्रा कस्तुरे तसेच विदर्भ प्रदेश उपाध्यक्षा मंगला मोरे यांनी तीव्र शब्दात निषेध केला.

याविषयी सविस्तर असे की, रायपूर येथील 16 वर्षीय कु. सपना अंबादास जमधडे या मुलीच्या खुनाची घटना उघडकीस येतास येथील सामाजिक कार्यकर्त्या कस्तुरे आणि मोरे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

जमधडे कुटुंब अत्यंत भीतीच्या वातावरणात असून त्या मयत मुलीचे जे मारेकरी आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी रायपूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याशी चर्चा करून संगमित्रा कस्तुरे यांनी कठोर शासन करण्याची मागणी केली तसेच पि.एस. आय. मोरे, पोलीस अंमलदार गवई यांनी अतिशय कमी वेळात तपास करून आरोपींना तात्काळ अटक केली त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here