रामटेक – राजू कापसे
मनसर माईन खदान येथील डबक्यामध्ये बुडुन एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज दि. १३ मे ला दुपारी १ वाजता दरम्यान घडली.प्रेम घनशाम धामोने वय (१७) वर्ष, राहणार मनसर आमराई असे मृतकाचे नाव असुन तो त्याच्या मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमाला वाहीटोला गावी आला होता.
यानंतर प्रेम हा त्याच्या चार – पाच मित्रांसह वाहीटोला येथील मनसर माईन खदानीच्या डबक्यामध्ये पोहायला गेले असता प्रेम याचा पाय घसरल्याने त्याचा तोल जावुन तो पाण्यामध्ये बुडाला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक सोनवाने हे कर्मचार्यांसह घटनास्थळी पोहोचले व पोहणाऱ्याच्या मदतीने प्रेम च्या प्रेताला काढण्याचा प्रयत्न केला असता प्रेत मिळाले नाही. बातमी लिहोस्तवर प्रेमचे प्रेत मिळालेले नव्हते. पुढील तपास रामटेक पोलिस करीत आहे.