चोहोट्टा बाजार येथील मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी; अवैध वाहतुकी कडे दहीहांडा पोलीसांचे दुर्लक्ष…

कुशल भगत

अकोट अकोला महामार्गावरील चोहट्टा बाजार येथे दररोज वाहतुकीची कोंडी होत असून नागरिकांना मोठा त्रास सोसावा लागत आहे अवैद्य वाहतूकदारांची या रोडवर चांगलीच चालती असल्याचे दिसून येते मात्र याकडे चोहोट्टा बाजार पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने वाहतूक कोंडीचा तिढा कायम आहे.

चोहट्टा बाजार येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो या गावाला लागून ५००च्या वर वीट पजाळ आहेत येथील मजूर वर्ग तसेच आजूबाजूच्या खेड्यातील लोकांची चोहोट्टा बाजार ही मुख्य बाजारपेठ असल्याने येथे प्रचंड वर्दळ राहते मात्र रोडवर फळ विक्रेते भाजी विक्रेते अतिक्रमण करीत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत आहे.

परिणामी अनेकदा तू तू मै क्या घटना घडून भांडण-तंटे निर्माण होतात तसेच वाहनांची गर्दी तुंडुंब असल्याने किरकोळ अपघात घडणे नित्याचेच झाले आहे येथील बस स्थानकावर अतिक्रमण करण्यात आल्याने प्रवाशांना दुसऱ्याच्या दुकानासमोर उभे राहून बस ची प्रतीक्षा करावी लागते,

या रोडवर ऑटो ट्रक काळी पिवळी आधी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची मक्तेदारी झाल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे लक्झरी व इतर अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने वाटेल तेथे उभी करण्यात येत असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होत असल्याचे चित्र येथे नेहमीच पाहण्यास मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here