शिरसाट फाटा ते अंबाडी मार्गावर चार तासापासून वाहतूक ठप्प…

शिवनसई येथे रस्त्यात झाड कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल. अपघातामुळे दोन्ही बाजूला पाच किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा.

वसई तालुक्यातील शिरसाट फाटा ते अंबाडी या राज्य महामार्गावर गेल्या चार तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गावरील शिवनसई गावाजवळ एक मोठे वडाचे पुरातन झाड पिकप टेम्पो वर कोसळल्याने अपघात झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी टेम्पोचा मोठे नुकसान झाले आहे.

अपघातामुळे दोन्ही बाजूला पाच – पाच किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागले आहेत..सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here