अहेरी आणि आलापल्लीत २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर पर्यत जनता कर्फ्यु पाळण्याचा व्यापारी संघटनेचा निर्णय…

गडचिरोली – मिलींद खोंड

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अहेरी व आलापल्ली शहरातील व्यापारी संघटनेचे पदाधिकारी आणि सर्वपक्षीय पदाधिकारी यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती, ह्या बैठकीत अहेरी व आलापल्ली शहरात सोमवार 28 सप्टेंबर ते रविवार 4 ऑक्टोबर पर्यंत ७ दिवस कडकडीत बंद ठेवण्यावर सर्वांचे एकमत झाले आहे.

व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र येऊन चर्चा करून ह्या कडकडीत बंदच्या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब करन्यात आले…,त्यानंतर ह्या निर्णयाची माहिती तहसीलदार, मुख्याधिकारी आणि पोलिस निरीक्षक अहेरी ह्यांना देण्यात आली.

कोरोनाचे थैमान दिवसेंदिवस अधिकच वाढत असून.. आता दक्षिण गडचिरोलीतही याचा प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टीने व्यापारी बांधवानी हे पाऊल उचलले आहे.त्यामुळे सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन अहेरी व आलापल्ली व्यापारी संघाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here